छत्रपती शिवराय स्मारक समिती, शिवाजी चौक, हिवरी नगर

थोडक्यात मनोगत…इ.स. २००२ ला हिवरी नगर चौकात शिवाजी चौक नावाचे फलक स्थानिक शिवप्रेमींच्या वतीनेलावण्यात आले. तेव्हापासुन आजवर दरवर्षी शिवजयंती चा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र २०११पासुन कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढले असुन अनेक सामाजिक व राजकिय संघटना या ठिकाणीकार्यक्रम करत असतात. त्यामुळे नागरीकांची या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणीझाली. शासन दरबारी अनेक पत्र व्यवहार झाले […]

थोडक्यात मनोगत…
इ.स. २००२ ला हिवरी नगर चौकात शिवाजी चौक नावाचे फलक स्थानिक शिवप्रेमींच्या वतीने
लावण्यात आले. तेव्हापासुन आजवर दरवर्षी शिवजयंती चा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र २०११
पासुन कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढले असुन अनेक सामाजिक व राजकिय संघटना या ठिकाणी
कार्यक्रम करत असतात. त्यामुळे नागरीकांची या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी
झाली. शासन दरबारी अनेक पत्र व्यवहार झाले नगरसेवक, आमदार, महापौर, आयुक्त पदांवर असलेल्या
अनेकांना निवदेन देण्यात आले. परंतु काहीही झाले नाही. परंतु या सर्व घडामोडी करतांना अनेक त्रास
जितका तेव्हा होता तितकाच आजही आहे.
इ.स. २०१६ मध्ये स्थानिक नगरसेविका मा. सौ. कांताताई रारोकर यांच्या वार्ड निधीतून हे
स्मारक निर्माण झाले. मात्र स्मारक निर्माण झाल्यावर त्याचे रितसर उद्घाटनासाठी कुणालाही वेळ
मिळालाच नाही. जवळपास ६ महिन्यानंतर अनंत चतुर्दशी च्या दिवशी महेन्द्र कठाणे व त्यांच्या
सहकाऱ्यांनी रात्री १२ च्या सुमारास स्मारकाचे अभिषेक करुन, माल्यार्पन केले व भगवा ध्वज लावला,
शिवाजी महाराजांशी निगडीत सर्व उत्सव पुर्व नागपूरातील या स्मारकाजवळ साजरे करण्याचा मानस
धरला. १९ फेब्रुवारी व तिथीप्रमाणे शिवजयंती थाटात साजरी केली जाते. ६ जुन २०१८ पासुन
शिवराज्याभिषेक सोहळा दिन जल्लोषात साजरा केला जातो. ज्यांच्यामुळे आज देवळात देव आहे,
मंदिरावर कळस आहे तसेच ३९० वर्षांनंतरही ज्या राजाला सामान्य माणुस देवाप्रमाणे मानतो अशा राजे
शिवछत्रपतींच्या उत्सवाला सहकार्य करतांना अनेक झण हात मागे घेतात हि एक शोकांतिका आहे.
इ.स. २०१८ ला स्मारक समितीची धर्मादाय कार्यालयात नोंदणी करण्याचे ठरविले. व या
समितीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. छत्रपती हे शिवरायांचे
स्मारक संपूर्ण महाराष्ट्रात कसे नाव लौकिकास येईल या करिता तसेच महाराजांचा पुर्णाकृती पुतळा
स्थापण करणे सदैव आम्ही प्रयत्नशिल आहोत. आपण सर्वांचे सहकार्य निरंतर लाभो हिच शिवचरणी
प्रार्थना.
सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत !…

  • विनीत
    छत्रपती शिवराय स्मारक समिती, शिवाजी चौक, हिवरी नगर.
Share the Post:

संबंधित पोस्ट

349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6 वाजता विधिवत मंत्रोच्चारात श्री वृषभ वांध्रे यांच्या सह संपुर्ण कुटुंबा तर्फे पूजन करण्यात आले

शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे 349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6

Read More

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजळांच्या शुभहस्ते करण्यात आले

शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Read More